Sale!
  • हडप्पा - रक्तधारेचा अभिशाप

हडप्पा - रक्तधारेचा अभिशाप

by विनीत बाजपयी
Categoryऐतिहासिक कादंबरी
Reading level१२ किंवा त्याहून जास्त
Languageमराठी

हडप्पा

105.00

You can also buy this from: amazon flipkart
Category:

Description

about this book

२०१७ दिल्ली – विद्यूतचे सर्वात वृद्ध पूर्वज शेवटच्या घटका मोजत आहेत आणि त्यांनी विद्यूतला बनारसला बोलावून घेतले आहे. देव-राक्षस मठाच्या किंवा देव-राक्षस कुळाचे प्रमुख असलेला तो वृद्ध ब्राह्मण विद्युतला थरकाप उडवणारे एक रहस्य सांगतो. त्यांच्या रक्तात अवघ्या मानवजातीला ग्रासणारा एक शाप भिनला आहे, आणि तो मानवजातीला पाशवी विनाशाकडे नेणार आहे.

इ.स. पूर्व १७०० हडप्पा – हडप्पा हे सरस्वती नदीच्या काठावर वसलेले एक भव्य शहर. या शहरात घडतात – विश्वासघातकी कृत्ये, जादूटोणा, आणि आपला आसुरी बदला पूर्ण करण्यासाठी शेवटच्या देवतेला केला जाणारा रक्ताभिषेक…आणि यातच दडले आहे – वैभवशाली नागर संस्कृतीच्या विनाशाचे भयंकर वास्तव.

२०१७ पॅरिस – जगातील सर्वात शक्तिशाली धार्मिक संस्था खिळखिळी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युरोपातील गुन्हेगारी जगताचा बादशाह एका रहस्यमय व्यक्तीला पॅरिसमध्ये भेटतो. रोमच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय याची चिंता लागून राहिलेली असतानाच एक मारेकरी रेल्वेत चढतो. जिच्याबद्दल भविष्यवाणी करण्यात आली होती ती देवता परतली आहे.

बनारस, हडप्पा आणि रोम यांना जोडणारा धागा कोणता? प्राचीन शाप काय आहे? ही शेवटची देवता कोण? बलाढ्य सिंधू संस्कृतीच्या नाशाचे कारण ठरलेले ते भयंकर सत्य कोणते? फसवणूक आणि हिंसा, देव आणि दानव, प्रेम आणि महत्वाकांक्षा यांनी भरलेल्या या कथेचा अनुभव घ्या

Additional information

ISBN

9788193642429

Size

5" X 7.79"

Pages

294

Binding

Paperback

Publishing Year

April 2018

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हडप्पा”

Your email address will not be published. Required fields are marked *